कोल्हापुरात तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांची आत्महत्या

कोल्हापूर – सौते (ता. शाहूवाडी) येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष केशव वारंग यांनी बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशव वारंग यांचे सौते (ता. शाहूवाडी) येथे राहते घर व किरकोळ किराणा विक्रीचे दुकान आहे. पत्नी, मुलगा भरत यांच्यासह ते येथे वास्तव्यास होते. तर त्यांच्या दोन मुलींचे विवाह झाले आहेत. केशव वारंग हे सोमवारी रात्री आठच्या सुमारास घरातील दुसऱ्या मजल्यावर गेले.

याचवेळी घरासमोरच्या चौकात गावातील तरुण मंडळी लाऊडस्पीकर लावून थर्टी फर्स्टचा जल्लोष साजरा करीत होते. दरम्यान केशव वारंग यांनी बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. चौकातील जल्लोषामुळे कोणालाही गोळीबाराचा आवाज ऐकू आला नाही. जेवणाच्या निमित्ताने रात्री नऊ वाजता भरतने वडिलांना हाक मारली. प्रतिसाद न मिळाल्याने त्याने वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता ही धक्कादायक घटना समोर आली. पोलीस निरीक्षक रानमाळे तपास करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)