कोल्हापुरात कारखान्याला भीषण आग

आगीत कारखाना मालकाचा होरपळून मृत्यू
कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील वाय पी पवार नगर येथे पाईप लिकेज होऊन ऑईल गळती झाल्याने कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत कारखाना मालकाचा होरपळून मृत्यू झाला. ही दुर्घटना के. एल. चव्हाण इंडस्ट्रीजमध्ये सकाळी घडली. या आगीत नरसिह लक्ष्मणराव चव्हाण (वय 65) यांचा मृत्यू झाला. ही आग अग्निशमनच्या चार गाड्यांच्या साहाय्याने तासभर केलेल्या अथक परिश्रमानंतर आटोक्‍यात आली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, नरसिंह चव्हाण यांची के. एल. चव्हाण इंडस्ट्रीज कंपनी आहे. रॉ मटेरियल वितळून भांडी तयार करण्याचे काम येथे केले जाते. आज सकाळी 10 वाजता काम सुरू करण्यासाठी नरसिंह चव्हाण यांनी फरनेस ऑईलचा व्हॉल्व सुरू केला. मात्र ऑइल पाईपला गळती असल्याने ते तापलेल्या भट्टीवर पडले. त्यामुळे ऑईलने पेट घेतला. आग लागल्याचे पाहताच कामगारांनी पळ काढला. मात्र चव्हाण गळती झालेल्या पाईपचा व्हॉल्व बंद करण्यासाठी पुढे गेले असता त्यांच्या कपड्यावरील ऑईलमुळे त्यांनी पेट घेतला.

या दुर्घटनेत ते गंभीररित्या होरपळले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. मात्र उपचारांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला.आगीबाबत समजताच अग्निशामकच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्‍यात आणली. या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाल्याने मदतकार्यात अडथळा आला. या घटनेमुळे कंपनीतील कामगार चांगलेच घाबरलेले होते. अग्निशामनदलाच्या सुमारे तासभर चालल्या प्रयत्नामुळे ही आग आटोक्‍यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)