कोल्हापुरात उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा

कोल्हापूर: कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी आंदोलन छेडण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 3 हजार वकील 27 जानेवारीपासून न्यायालयीन कामकाजपासून अलिप्त राहणार आहेत, तर 30 जानेवारी रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो वकील सनद परत करणार असल्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे या मागणीसाठी कोल्हापूरसह सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो वकील आणि हजारो पक्षकार मागणी करत आहेत. परंतु 35 वर्षांपासून ही मागणी सरकार दरबारी प्रलंबित आहे. या मागणीसाठी उग्र आंदोलन करण्यात आली होती. तसेच मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात होईल, असे आश्वासनही दिले होते. परंतु अद्याप देखील या आश्‍वासनांची पूर्तता झाली नसल्याने कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने आज झालेल्या बैठकीत आंदोलन आंदोलन करायचा निर्णय घेण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)