कोल्हापुरात आज आणि उद्या माणुसकीची भिंत 

कोल्हापूर: “नको असले ते द्या, हवे ते घेवून जा’ हे ब्रिद वाक्‍य घेवून माणुसकीची भिंत उद्या शुक्रवार (दि.1) व शनिवार (दि.20 या दोन दिवस सीपीआर चौकात आयोजित केली जाणार आहे. जूनी परंतू वापरा योग्य कपडे घेवून ती गरजूंना या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहेत. सकाळी नऊ वाजता महापौर शोभा बोंद्रे व विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे – पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. वापरण्यायोग्य जुनी-नवी कपडे दान करावीत तसेच गरजूंनी त्याचवेळी घेवून जावीत, असे आवाहन संयोजकांच्यावतीने आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.

अगळी वेगळी सामाजिक दिवाळी म्हणून प्रसिध्द झालेला माणुसकीची भिंत हा उपक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. गेल्या दोन वर्षात या उपक्रमाला दातृत्ववान कोल्हापूरकरांनी मोठा उर्त्स्फूत प्रतिसाद दिला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला उपक्रमाचे पुन्हा आयोजन केले आहे. मागील दोन वर्षात तीन लाखांहून अधिक कपडे गरजू लोकांपर्यंत पोहाचवता आल्याचा दावा संयोजकांनी केला आहे.

या उपक्रमासाठी कपडे देताना ते स्वच्छ धुवून, इस्त्री करुन आणि पुरूष, मुले आणि महिला अशी वर्गवारी करुन दिल्यास ते गरीब गरजूंना अधिक चांगल्या पद्धतीने देता येतील, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री सात वाजपर्यंत कपडे जमा व वाटप केले जाणार आहेत. या कालावधीत जमा झालेले कपडे शिल्लक राहिल्यास ते उस तोडणी कामगारांना वाटप करण्यात येणार आहेत. तसेच शिल्लक राहिलेल्या इतर कपड्याच्या पिशव्या शिवून त्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. काही कपड्यापासून अंगावरील पांघरुन शिवून ते फिरस्त्यांना देण्याचा मानस संयोजकांनी व्यक्त केला. मागील वर्षीप्रमाणेच दातृत्ववान कोल्हापुकरांनी या उपक्रमांत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)