कोल्हापुरात आजीनेच 3 महिन्यांच्या नातीचा घोटला गळा

कोल्हापूर: आईचे दूध कमी झाल्याने दुधाला आणि औषधाला पैसे कुठून आणायचे या कारणावरुन आजीनेच आपल्या 3 महिन्याच्या नातीचा गळा घोटून खून केल्याची हृदयद्रावक घटना घडली. सून शहनाज शब्बीर मुल्ला हिने दिलेल्या फिर्यादीनुसार आजी महोबतबी आदम मुल्ला हिला राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिफाना असे त्या 3 महिन्याच्या दुर्दैवी बाळाचे नाव असून याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोल्हापुरातील यादवनगर परिसरातील कोटीतीर्थ वसाहत येथील शब्बीर मुल्ला यांच्यासोबत शहनाज मुल्ला यांचा मे 2017 मध्ये विवाह झाला होता. तीन महिन्यांपूर्वी त्यांना एक मुलगी झाली. पण जन्मापासून ती सारखी आजारी असायची. शिवाय शहनाज अशक्त असल्याने तिच्या दुधावर बाळाचे पोट भरत नव्हते. त्यामुळे दूध पावडर आणून बाळाला द्यावे लागत होते. त्यामुळे नेहमी खर्च होत होता. यावरुन सासू महोबतबी आदम मुल्ला तिला नेहमी टोमणे मारत असे. शिवाय शब्बीरचे दुसरे लग्न करुन देतो, अशी धमकी देत असे.

-Ads-

शनिवारी सकाळी सासू बाळाला घेऊन बाहेरच्या खोलीत बसली होती. सून शहनाज आतल्या खोलीत घरातील काम आवारात होत्या. काही वेळाने बाळाचा काहीच आवाज येत नसल्याने तिने बाहेर येऊन पाहिले असता बाळ कसलीच हालचाल करत नसल्याचे तिला दिसून आले. तिने बाळाला उठवण्याचा प्रयत्न केला तरीही त्याने कसलीच हालचाल केली नाही. तेव्हा तिला बाळाच्या गळ्यावर वळ दिसून आला. शहनाजने तत्काळ बाळाला सीपीआर येथे दाखल केले. पण डॉक्‍टरांनी बाळ उपचारापूर्वीच मृत झाल्याचे सांगितले. त्यानुसार सून शहनाजने याबाबत राजारामपुरी पोलिसात फिर्याद दिली असून, सासू महोबतबी आदम मुल्ला हिला राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)