कोल्हापुरात अमिताभ बच्चन यांचा रि-बर्थ डे मोठ्या उत्साहात साजरा

कोल्हापूर – अमिताभ फॅन्स क्लब वर्ल्डवाइड-कोल्हापूर व टिम एबीइफ कोल्हापूर यांच्या तर्फे महानायक सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा काल 2 ऑगस्ट 2018 रोजी 36 वा रि-बर्थ डे मोठ्या उत्साहात वर्ल्ड फॅन्स डे म्हणून कोल्हापूर मध्ये दोन सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.

अमिताभ बच्चन यांचा कुली चित्रपटाच्या सेटवर अपघात झाला होता. त्या वेळी त्यांची प्रकृती इतकी बिघडली होती की ते कोमा मध्ये गेले होते. त्या वेळी त्यांच्या कोट्यावधी फॅन्स साठी हा एक जबरदस्त धक्का होता. जगातील कोट्यावधी फॅन्स नी त्यावेळी त्यांच्या प्रकृती साठी प्रार्थना केली होती. परमेश्वराने त्या प्रार्थनांचा स्वीकार करत दोन ऑगस्ट 1982 रोजी अमिताभ बच्चन कोमातून बाहेर आले होते. त्यामुळे त्या दिवसापासून 2 ऑगस्ट हा दिवस जगातील अमिताभ बच्चन यांच्या फॅन्स कडून “विजय दिवस” म्हणून साजरा केला जातो. स्वतः अमिताभ बच्चन यांनी आजच्या दिवसाचे महत्व काही वर्षांपूर्वी त्यांच्या ब्लाॅग वर लिहून तमाम चाहत्यांचे आभार मानले होते.

-Ads-

या दिवसाचे औचित्य साधून आज कोल्हापूर येथे अंबाबाई मंदीर येथे भाविकांसाठी दोन व्हीलचेअर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना देवस्थान समिती कार्यालय येथे प्रदान करण्यात आल्या. त्यासाठी ग्रुप मेंबर अमरदिप पाटील व विक्रांत पाटील किणीकर यांचे विशेष योगदान लाभले. श्री महेश जाधव यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून भविष्यात अशाच पद्धतीने समाज विधायक कार्य सुरू ठेवावे या शब्दात ग्रुप चे कौतुक केले. या वेळी ग्रुप मेंबर मधुरिमाराजे छत्रपती, आमदार सुजित मिणचेकर, सूर्यकांत पाटील बुधीहाळकर,अॅड.इंद्रजित चव्हाण, अमरदिप पाटील, विक्रांत पाटील-किणीकर, स्मिता सावंत, अॅड.सरिता भोसले, दिपाली चौगुले, पंडीत घोरपडे, दिनेश माळी, प्रशांत जगताप, किरण शहा, राहूल राठोड सागर कोळेकर ,शैलेश देशपांडे व शेफाली मेहता तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच विशेष मुलांसाठी कार्यरत असणारी स्वयम संस्था कोल्हापूर इथे दोन विशेष विद्यार्थी अमिताभ फॅन्स क्लब वर्ल्डवाइड यांच्या तर्फे दत्तक घेण्यात आले. त्या वेळी ग्रुप मेंबर यांनी संस्थेतील सर्व विशेष मुलांबरोबर संवाद साधत अमिताभ बच्चन यांची गाणी, डायलॉग तसेच नृत्य करून त्यांना आनंद दिला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)