कोल्हापुरातील ईएसआय हॉस्पिटल १ मे पासून होणार कार्यरत

कोल्हापूर – राज्य शासनाची अनास्था आणि दुर्लक्षामुळं, गेली २० वर्षांहून अधिक काळ कोल्हापुरातील ईएसआय हॉस्पिटल बंद आहे. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक यामध्ये झाली असूनही, या रुग्णालयाचा लाभ गरजूंना होत नाही. हे हॉस्पिटल पूर्ण क्षमतेनं सुरु व्हावं आणि केंद्र शासनानं हे हॉस्पिटल चालवावं, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी वारंवार संसदेत पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना यश आलंय. १ मे पासून हे हॉस्पिटल केंद्र सरकारच्यावतीनं चालवण्यात येईल, अशी घोषणा खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज कोल्हापुरात केली.

कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथं १५ एकर जागेत ईएसआय हॉस्पिटल उभं आहे. पण गेली २० वर्ष हे हॉस्पिटल बंद असल्यामुळं, या रुग्णालयाचा गरजूंना लाभ होत नाही. तसंच कोट्यवधी रुपयांच्या इमारतीचीसुद्धा दुरावस्था होवू लागलीय. यासंबंधी खासदार धनंजय महाडिक यांनी, २७ जुलै रोजी संसदेत प्रश्‍न उपस्थित करुन, वाचा फोडली होती. १५ एकर जागेमध्ये बांधलेले शंभर बेडचे हॉस्पिटल आजवर बंद असल्याने, हजारो शासकीय कर्मचार्‍यांना त्याचा लाभ मिळत नसून, कोल्हापुरातील ईएसआय  हॉस्पिटल तातडीने सुरू करावे, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली होती दरम्यान महाडिक यांच्या प्रयत्नांना यश आलं असून, हे रुग्णालय १ मेपासून, सुरु करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)