कोलकात्यात स्फोट ; एक ठार, दहा जखमी 

तृणमुल कॉंग्रेस कार्यालयाबाहेर झाला स्फोट 
कोलकाता: कोलकाता शहरातील नगरबझार भागातील काजीपाडा येथे आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमाराला झालेल्या एका शक्तीशाली स्फोटात एक सात वर्ष वयाचे बालक ठार झाले तर अन्य दहा जण जखमी झाले. तृणमुल कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेरच हा स्फोट झाल्याने या प्रकरणाला राजकीय रंगही चढला आहे. भाजपच्या समर्थकांनीच हा स्फोट घडवून आणल्याचा आरोप तृणमुल कॉंग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.
ऍल्युमिनीयम नायट्रेटचा वापर करून हा स्फोट घडवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तथापी याविषयी आणखी तपास सुरू आहे. स्फोट करणाऱ्यांचे कोणतेही धागेदोरे अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत. आज गांधी जयंतीची सुट्टी असल्याने स्फोट झाला त्यावेळी या भागात फारशी वर्दळ नव्हती. एरवी हा भाग वर्दळीचा असतो. या घटनेचा निषेध करून मार्क्‍सवादी पक्षाचे नेते सुजन चक्रवर्ती यांनी म्हटले आहे की बंगाल मध्ये रोजच कुठेना कुठे असे हिंसक प्रकार घडत असतात विद्यमान सरकार सुरक्षित बंगाल आम्हाला देऊ शकत नाही काय असा सवाल त्यांनी केला. या प्रकारामागे भाजपचा हात असल्याचा आरोप तृणमुल कॉंग्रेसने केला आहे. तथापी भाजपने हा आरोप फेटाळा असून तृणमुलला भाजपवर असे बेभान आरोप करण्याची सवयच लागली आहे असे भाजपचे नेते दिलीप घोष यांनी म्हटले आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)