कोलकात्यात विजेच्या धक्‍क्‍याने गणेश विसर्जन करताना 3 ठार, 7 जखमी

कोलकाता (पश्‍चिम बंगाल) – गणेश विसर्जनासाठी मूर्ती नेत असताना विजेचा धक्का बसल्याने 3 जण मरण पावले असून अन्य 7 जण जखमी झाल्याची माहिती कोलकत्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. बाजा कदमताल घाटावर ही दुर्घटना घडली आहे. बिमल साहानी (37),जितेन्द्र साहानी (28)बितॉश मंडल (30) अशी मरण पावलेल्यांची नावे आहेत, तर महेश शॉ (22), दिनानाथ राम(15), अमर मंडल (45), अर्जुन चेत्री (20) आणि मोहन साहानी (35) या जखमींना उपचारासठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. तर आशिश पोद्दार आणि निरंजन सरदार या दोघांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले.

254 फूट उंचीच्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी नेत असताना ही दुर्घटना घडली. रेल्वे रूळ ओलांडत असताना गणेश मूर्तीचा हात विजेच्या तारांना अडकला आणि पोलमधून तार सुटून मूर्तीवर पडली. लाकडी काठ्यांच्या साह्याने विजेच्या तारा हलवत असताना शॉक बसून वरील तिघे मरण पावले आणि 78 जण जखमी झाले.
सामान्यत: आम्ही 18 फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींना परवानगी देत नाही, परंतु गणपतीची ही मूर्ती अधिक उंचीची असल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांने कळवली आहे.
मूर्तीच्या उंचीचे “नॉर्म” त्यांनी पाळले असते, तर ही दुर्घटना टळली असती, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)