कोलकात्यात भाजपच्या रथयात्रेला हायकोर्टाकडून सशर्त परवानगी

कोलकात: पश्‍चिम बंगालमध्ये रथयात्रा आयोजित करण्यास कोलकाता उच्च न्यायालयाने भारतीय जनता पार्टीला परवानगी दिली आहे. पश्‍चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेस सरकारकडून जातीय तणावाची शक्‍यता दर्शवून भाजपच्या रथयात्रेला परवानगी नाकारली होती. त्याविरोधात भाजपने हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

न्या. तपब्रत चक्रबर्ती यांनी भाजपच्या रथयात्रेला परवानगी दिली आणि रथयात्रा होणार असलेल्या जिल्ह्यांच्या पोलिस अधिक्षकांना किमान 12 तास आगोदर पूर्वकल्पना देण्याची सूचना भाजपला केली. तसेच रथयात्रेमुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखली जावी आणि वाहतुकीला अडथळा होऊ नये, याची काळजीही घेण्यात यावी, अशी सूचनाही कोर्टाने भाजपला केली आहे. या रथयात्रेमुळे जर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले तर त्याला भाजप जबाबदार असेल. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्ततैनात करण्यात यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भाजपने पश्‍चिम बंगालमधील विधानसभेच्या 42 मतदारसंघांमधून रथयात्रा काढण्याचे ठरवले आहे. सुमारे दिड महिनाभर ही रथयात्र सुरू असणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)