कोलकाताच्या परिसरात संशयास्पद रेडिओ संदेश 

कोलकाता – गेल्या आठवड्यापासून कोलकाता आणि परिसरामध्ये “कोड’ भाषेतील संशयास्पद रेडिओ संदेश पसरवले जात असल्याचे उघड झाले आहे. कोलकातातील हौशी “हम’च्या रेडिओ ऑपरेटरनी हे रेडिओ संदेश पकडले आहेत. या रेडिओ लहरींवर अव्याहतपणे लक्ष ठेवायला आता सुरुवात झाली आहे.
या गूढ रेडिओ लहरींबाबत सर्वप्रथम काही आठवड्यांपूर्वी दिवाळीच्या सुरुवातीला समजले होते. या रेडिओ लहरींवरील कोड भाषा 24 परगणा जिल्ह्यातील सोदपूर भागातील होती. तेंव्हापासून हुगळी जिल्ह्यातील चुचुरा आणि सीयालदाह या भागात रात्रीच्यावेळी हे रेडिओ संदेश मिळत असतात. हा भाग कोलकातापासून 25 ते 30 किलोमीटरच्या परिसरातील आहे.
या संशयास्पद संदेशांबाबत “हम’ रेडिओच्या ऑपरेटरने पोलिस, केंद्रीय तपास संस्था आणि दूरसंचार मंत्रालयाला कळवले आहे. या रेदिओ संदेशांच्या आधारे संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळत नाही. संबंधितांची ओळख विचारली असता पलिकडून प्रतिसाद ऐकू येत नाही, असे “बेंगाल अमॅच्युअर रेडिओ क्‍लब’चे सचिव अंबरिश नग बिस्वास यांनी सांगितले.
या रेडिओ लहरींवर संवाद साधणारे पश्‍तुन उच्चारात बोलत असतात. मात्र ही भाषा ओळखता येऊ शकली नाही. “हम’ रेडिओला याबाबत पहिल्यांदा कळवले तेंव्हा याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते, असे बिस्वास यांनी सांगितले.
पश्‍तो ही प्रामुख्याने अफगाणिस्तानमध्ये बोलली जाणारी भाषा आहे. हे समजल्यावर बिस्वास यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाला ही माहिती दिली. या संशयास्पद रेडिओ लहरींबाबतचे सापडलेले पूर्ण तपशीलही “इंटरनॅशनल वायरलेस मॉनिटरींग स्टेशन’, पोलिस आणि केंद्रीय गुप्तचर संस्थांना दिले आहेत. या रेडिओ लहरींवर कायम लक्ष ठेवण्यास आम्हाला सांगितले गेले आहे, असेही ते म्हणाले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)