कोऱ्हाळेतील गैरकारभाराच्या चौकशीसाठी उपोषण

जळोची-बारामती तालुक्‍यातील कोऱ्हाळे खुर्द ग्रामपंचायतीच्या कारभारासंबंधी गटविकास अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तक्रारी करुन देखील फक्त आम्ही तक्रारी दुरुस्त केल्या जात असल्याची उत्तरे दिली जात आहेत. याविषयी सखोल चौकशी करावी, या मागणीसाठी पंचायत समिती शेजारी बाळासाहेब बाजीराव खोमणे व त्यांचे सहकारी आज (सोमवार) पासून उपोषणला बसले आहेत.
शासनाच्या 4 जानेवारी 2017 च्या परिपत्रकाप्रमाणे अंमलबजावणी करावी व त्यानुसार गुन्हे दाखल करावेत, गावामधील रस्त्याची सिमेंट कॉंक्रीटने कामे केलेली आहेत. मात्र, अवघ्या दोन महिन्यात रस्ते उखडलेले आहेत. वास्तिक पाहता सिमेंटचे रस्ते 15 ते 20 वर्ष सरकारी नियमानुसार टिकलेच पाहिजे; परंतु या गावातील रस्ते पूर्णत उखडलेले आहेत. याची चौकशी होण्याची मागणी केल्यास वरवरच्या स्वरुपाची चौकशी केल्याची उत्तरे दिली जातात. तसेच या ग्रामपंचायतीची 2010 ते 2018 पर्यंतच्या कारभाराची उच्चस्तरीय सखोल त्रयस्थ यंत्रणेमार्फंत करावी, त्याचप्रमाणे या वर्षातील विविध कामांची अंदाजपत्रकानुसार सखोल चौकशीही त्रयस्थ यंत्रणेमार्फंत व्हायला पाहिजे, असे खोमणे यांनी सांगितले.
पाणीपुरवठा योजनेसाठी 49 लाख रुपये खर्चून ही पिण्याचे पाणी मिळत नाही. लिट वस्ती रस्त्यासाठी 28 लाख 98 हजार खर्च करुन सुद्धा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. बंदीस्त गटार योजनेकरिता 20 लाख खर्चून सुद्धा चेंबर नाही. गटाराचे पाणी रस्त्यावर पसरत असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी वाढलेली आहे. स्मशानभूमीसाठी 2 लाख 98 हजार खर्च केला आहे; परंतू बैठक व्यवस्था मोडकळीस आली आहे. कोऱ्हाळे खुर्द ते कोऱ्हाळे बुद्रुक या रस्त्यासाठी 12 लाख खर्च केले; परंतु अजून ही रस्ता नाही. त्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांना काटेरी झुडपे, खड्डे चुकवत प्रवास करावा लागत आहे. गावातील सभामंडपाची व्यवस्था, तर भयावह आहे. या सर्व कामांवर आमचा आक्षेप असून याची चौकशी करण्याची मागणी खोमणे यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)