कोरेगाव मूळमध्ये अखंड हरिनाम सप्ताह

संग्रहित छायाचित्र

उरुळी कांचन – कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामस्थ आयोजित श्रीराम जन्मोत्सव, हनुमान जयंती निमित्ताने श्री जगदगुरु तुकोबाराय गाथा सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह 25 मार्च ते 1 एप्रिल आयोजित करण्यात आला आहे. पहाटे काकड आरती, सकाळीग्रंथवाचन, नंतर गाथा भजन, दुपारी महिला भजन, सायंकाळी प्रवचन, रात्री साडे हरिकीर्तन आणि रात्री अकरानंतर हरिजागर असा दिनक्रम असणार आहे. रविवारी (दि. 25) हभप दत्तात्रय कोंडे यांचे प्रवचन आणि हभप गोरक्षनाथ सुतार कीर्तन होणार आहे. या काळात हभप बाबा गायकवाड, हभप नीता काचंन, हभप महंत दत्तराज बाळापूरकर, हभप विनायक काचंन, हभप डॉ.रवींद्र भोळे, हभप नाना काळे यांची प्रवचने होणार आहेत. त्याचबरोबर हभप गोरक्षनाथ वरपे, हभप गोरक्षनाथ वरपे, हभप भिष्माचार्य बाबा, हभप गणेश हरतळे, हभप चेतन शिंदे, हभप-किरण भागवत यांची कीर्तने होणार असून, काल्याचे कीर्तन रविवारी (1 एप्रिल) हभप आकाश कामथे यांचे होणार आहे. याप्रसगी कलश, गाथा आणि विणा पूजन होणार असल्याची माहिती अखंड हरिनाम सप्ताह समितीच्या वतीने देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)