नवी दिल्ली: कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी अटक केलेल्या ५ जणांच्या नजरकैदेत वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, वरवर राव आणि वरनॉन गोन्साल्वीस याना कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी ताब्यात घेतले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं त्यांना अटक न करता त्यांना नजर कैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, पाचही जणांच्या नजरकैद 17 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली असून त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होईल. कोरेगाव भीमा दंगलीच नक्षल कनेक्शन शोधण्यासाठी पुणे पोलिंसानी मुंबई, ठाणे मध्ये ठिकठिकाणी छापे टाकले होते. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी ५ जणांना अटक केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)