कोरेगाव भीमा हिंसाचार: गौतम नवलखा , प्रा.आनंद तेलतुंबडे तूर्त दिलासा 

26 ऑक्‍टोबर पर्यंत कारवाई न करण्याचे हायकोर्टाचे आदेश 

मुंबई: पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा हिंसाचारामागे माओवादी असल्याच्या संशय असल्याचा दावा करून माओलवाद्यांची सबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गौतम नवलखा आणि प्रा.आनंद तेलतुंबडे यांना उच्च न्यायालयाने तूर्त दिलासा दिला. त्यांच्या विरोधात 21 नोव्हेबर पर्यंत कारवाई करू नका असा आदेश पुणे पोलिसांना दिला. तसेच आनंद तेलतुंबडे आणि स्टॅन स्वामी यांच्याविरोधातही तोपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नका असे निर्देशही हायकोर्टाने दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी आपल्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करुन घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर न्या. रणजित मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने 21 नोव्हेबर पर्यंत सुनावणी तहकूब ठेवताना त्याच्या विरोधात तूर्त कोणतीही कारवाई करून नये असे आदेश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)