कोरेगाव भीमा सज्ज; चोख सुरक्षाव्यवस्था

दोन हजार पोलिसांचे संचलन : परिसराला छावणीचे स्वरुप

शिक्रापूर: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) परिसरात दि. 1 जानेवारी 2018 ला झालेल्या दंगलीची पुनरावृत्ती यंदा होवू नये यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी परिसरात मोठा फौजफाटा लावला असून आज (सोमवारी) पुणे-नगर महामार्गावरुन दोन हजार पोलिसांनी संचलन केले. दरम्यान, मोठा फौजफाटा तैनात असल्याने परिसराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोरेगाव भीमा व सणसवाडी परिसरात दि. 1 व दि. 2 जानेवारी 2018 रोजी झालेल्या दंगलीच्या पार्श्‍वभूमिवर यावर्षी प्रशासनाने कमालीची सतर्कता बाळगली आहे. कोरेगाव भीमामध्येच दोन हजारांपेक्षा अधिक पोलीस फौजफाटा, वरुण व वज्र वाहने, अग्निशमन बंब तसेच इतर सामुग्रीसह राज्य राखीव दलाच्या 7 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. कोरेगाव भीमा परिसरातील गावांमधून सामाजिक सलोखा जपण्यासाठी गावातील प्रत्येक चौकात, वस्तीवर एक पोलीस अधिकारी व 10 कर्मचारी तैनात करण्यात आहेत. कोरेगाव भीमा, पेरणे व वढु बुद्रुक याठिकाणी 27 डिसेंबर पासुनच पाच हजारांपेक्षा अधिक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे तर रविवार (दि. 30) पासून या पोलिसांचे गावोगावांत संचलन सुरू करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक संदिप पाटिल यांच्या सुचनेप्रमाणे घेण्यात आलेल्या या संचलनामध्ये उपअधीक्षक कोल्हापूर सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक (सातारा), धीरज पाटील, उविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरसगावकर, किशोर काळे, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल कोळेकर, 20 पोलीस निरीक्षक, 40 पोलीस उपनिरीक्षक, 800 जिल्हा पोलीस, 400 होमगार्ड व राज्य राखीव पोलीस दलाच्या सात तुकड्यांमधील जवान सहभागी झाले आहेत. या संचलनामुळे नागरिकांनीही समाधान व्यक्‍त केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)