कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी शौर्यदिनाचा कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज

टोलनाका परिसरात भाषणे व सभांना परवानगी 

शिक्रापूर: कोरेगाव भीमा व पेरणे येथे एक जानेवारी शौर्यदिनाचा होणारा कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह विजय रणस्तंभ परिसरराला भेट देत पाहणी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोरेगाव भीमा व पेरणे येथे एक जानेवारीला शौर्यदिनी येणाऱ्या समाज बांधवांचे स्वागत करत शौर्यदिनाचा होणारा कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हास्तरावरील प्रशासन करीत आहे. मंगळवार (दि. 25) नुकतीच जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पेरणे येथील विजय रणस्तंभ परिसरराला भेट दिली. परिसराची पाहणी केली.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पाटील, प्रांताधिकारी भाऊ गलंडे, लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक मानकर, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर, कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, शिरूरचे तहसीलदार रणजीत भोसले, हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी, पेरणेचे सरपंच रुपेश ठोंबरे, प्रशांत उबाळे, सचिन कडलग, विशाल सोनवणे भाऊदास भालेराव, बाळासाहेब भालेराव यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा प्रशासन व कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने होणारा कार्यक्रम शांततेत पार पडावा, यासाठी विशेष परिश्रम घेतले जात आहे. या भेटीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वतीने संपूर्ण परिसराची पाहणी करून कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला आहे. विजय रणस्तंभ परिसररात कोठेही सभा व भाषणे करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. विजय रणस्तंभापासून काही अंतरावर पुणे नगर रस्त्यालगत असलेल्या टोलनाका परिसरात भाषणे व सभा घेण्यात येतील असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

कार्यक्रम शांततेत पार पडणार
कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे म्हणाले की, विजय रणस्तंभ या ठिकाणी शौर्य दिनी होणाऱ्या कार्यक्रमाचे जिल्हा प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने अतिशय चांगले नियोजन करण्यात आले आहे. होणारा कार्यक्रम शांततेत पार पडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)