कोरेगाव भीमा नदीपात्रात आढळला नवजात अर्भकाचा मृतदेह

शिक्रापूर-कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील भीमा नदी पात्रात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एका बेवारस नवजात अर्भकाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना आढळून आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी आहे. मृतदेह तरंगत असल्याचे येथील नागरिकांना दिसले. त्यानंतर त्यांनी शिक्रापूर पोलिसांना याबाबत माहिती दिली असता शिक्रापूर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करत पंचनामा करून हा मृतदेह पाण्याबाहेर काढला. पुरुष जातीच्या अंदाजे दोन तीन दिवसांच्या बालकाचा बेवारस मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी या मृतदेहाबाबत आजूबाजूला चौकशी केली असता काहीही माहिती मिळू शकली नाही. याबाबत निलेश रामदास गव्हाणे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश वारुळे हे करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)