कोरेगाव भीमा दंगल पोलीस निरीक्षकांना भोवली?

शिक्रापूर- येथील पोलीस ठाण्यात जून 2016 पासून कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांची आज (शनिवारी) पुण्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण विभागात बदली करण्यात आली आहे. दरम्यान, कार्यकाळ संपण्याच्या एक महिना आगोदरच त्यांची बदली झाल्याने कोरेगाव भीमा दंगल प्रकरण त्यांना भोवले की त्यांनी स्वत:हून बदली करून घेतली याबाबत उलट सुलट चर्चा रंगली आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून यापूर्वी कार्यरत असलेले आणि गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या पकडून तसेच वाहतूककोंडी, चोऱ्या यावर नियंत्रण आणत 2015 मध्ये चांगलेच नावारूपाला आलेले श्रीकांत कंकाळ यांचा दोन वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांच्या जागेवर रमेश गणपतराव गलांडे यांची 29 जून 2016 रोजी नियुक्ती करण्यात आली होती. रमेश गलांडे यांच्या नियुक्तीनंतर काही दिवसांनी या भागातील गुन्हेगारींचे प्रमाण चांगलेच वाढले तर अलीकडील काळामध्ये कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील दंगल प्रकरणामुळे शिक्रापूर पोलीस ठाणे तसेच पोलीस निरीक्षक रमेश गलांडे हे महाराष्ट्रात तसेच विधान भवनात चांगलेच गाजले गेले. तर अनेकांनी कोरेगाव भीमा येथील दंगलीचा ठपका त्यांच्यावर ठेवला आणि त्यांचा शिक्रापूर पोलीस ठाण्यातील कार्यकाळ पूर्ण होण्याच्या एक महिना आधीच त्यांची पुणे पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण विभागात बदली करण्यात आली आहे. दरम्यान, कार्यकाळ संपण्याच्या एक महिना आधीच त्यांची बदली करण्यात आली असल्यामुळे बदलीचे कारण समजू शकले नाही. तर कोरेगाव भीमा येथील दंगलीमुळेच बदली झाली की बदली करून घेतली याबाबत शिक्रापूर परिसरात चर्चांना उधाण आले आहे.

  • सिंघम अधिकाऱ्याची गरज
    शिक्रापूर येथील पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश गलांडे यांची बदली झाल्यानंतर अनेक तर्कवितर्क वर्तवले जात आहे. तर कोरेगाव भीमा दंगलीचे चांगलेच पडसाद उमटले असल्यामुळे सध्या तरी येथे येण्यासाठी कोणी अधिकारी स्वतःहून पुढे येणार नाही, तसेच येथे एखाद्या कर्तव्यदक्ष आणि सिंघम अशा अधिकाऱ्याचीच येथे गरज असल्याची सध्या या परिसरात चर्चा सुरू आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)