कोरेगाव भीमा दंगलीतील गणेश फडतरेवर स्थानबद्धचे आदेश

संग्रहित छायाचित्र

शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे झालेल्या दंगलीमध्ये आरोपी असलेले कोरेगाव भीमाचे माजी उपसरपंच गणेश फडतरे (वय 28) यांच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी यांनी दिल्याची माहीती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या दंगलीमध्ये मुख्य आरोपी असलेला कोरेगाव भीमाचे माजी उपसरपंच गणेश भाऊसाहेब फडतरे याने या गुन्ह्यातून जामीनावर मुक्तता होताच कोरेगाव भीमा येथे हत्याराने मारहाण केल्याचे दोन गंभीर गुन्हे केले. त्यांनतर त्याची दहशत वाढत गेल्याने शिक्रापूर पोलिसांनी त्याला अटक केले. फडतरे हा एका गुन्ह्याच्या प्रकरणी येरवडा कारागृहात आहे. तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सराईत गुन्हेगारांची वाढत चाललेली दहशत मोडीत काढण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

-Ads-

यावेळी शिक्रापूर पोलिसांनी देखील शिक्रापूर पोलीस ठाण्यात फडतरे याच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचे पाच गुन्हे, याशिवाय गर्दी, मारामारी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर वाळू तस्करी करणे आणि अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हे, शिक्रापूर परिसरातील कंपन्यांना खंडणी मागणे, औद्योगिक ठेक्‍यासाठी कंपनीत मारहाण करणे अशा स्वरूपाच्या दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती देत गणेश फडतरे याच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय दौंड आणि पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला.

त्यानंतर पुणे जिल्हाधिकारी यांनी गणेश फडतरे यास एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यांनतर लगेचच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी येरवडा कारागृहात जात त्या आदेशाची अंमलबजावणी केली आहे. तर याबाबत बोलताना पोलिसांनी, ग्रामीण भागातील गुंडांना आळा बसावा. यासाठी यापुढे देखील अशा स्वरूपाच्या कारवाया सुरू राहणार आहेत. तसेच नागरीकांनी देखील न घाबरता सराईत गुन्हेगारांविरोधात तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन केले आहे.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)