कोरेगाव भीमा चौकशी आयोगास मुदतवाढ

पुणे – कोरेगाव-भीमा येथील हिंसाचार प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगाला मुदतवाढ देण्यात आली आहे. आयोगाचे कामकाज सुरूवातीच्या नियोजनानुसार मंगळवारी (दि.8) संपुष्टात येणार होते. मात्र, अजून कामकाज पूर्ण झाले नसल्याने राज्य सरकारने दि.8 मेपर्यंत आयोगाला मुदतवाढ दिली आहे.

कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे. एन. पटेल आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सुमीत मलिक यांचा द्विसदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई आणि पुण्यात आयोगाचे सुनावणीचे कामकाज सुरू आहे. आयोगाकडून पहिल्या टप्प्यात 3 ते 6 ऑक्‍टोबरपर्यंत चार जणांच्या साक्षी तपासण्याचे कामकाज करण्यात आले होते. तर, दुसऱ्या टप्प्यात 12 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत पुण्यात जुन्या जिल्हा परिषदेतील आयोगाच्या कार्यालयात कामकाज झाले. दरम्यान, यापूर्वी आयोगाने गेल्या वर्षी मेमध्ये कोरेगाव-भीमा, पेरणे फाटा, वढू-बुद्रुक, सणसवाडी येथे भेट देऊ न स्थानिक नागरिकांशी संवाद साधला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच चौकशी आयोगाकडे हिंसाचार प्रकरणी विहित मुदतीमध्ये सर्वसामान्य नागरिक, पोलीस आणि प्रशासन यांच्या माध्यमातून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. प्राप्त अर्जांची पडताळणी करून संबंधित प्रतिज्ञापत्रांवर सुनावणी, साक्षी तपासण्याचे काम पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू आहे. आयोगाचे तिसऱ्या टप्प्यातील पुण्यातील कामकाज जानेवारीच्या अखेरीला होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)