कोरेगाव भीमा ग्रामपंचायत कामगारांची दिवाळी

file photo

कोरेगाव भीमा -दिवाळीच्या तोंडावर कोरेगाव भीमा (ता. शिरूर)ग्रामपंचायतच्या वतीने कर्मचारी वर्गासाठी तब्बल एक पगार व दोन बोनसचे वाटप ग्रामपंचायत कार्यालयात पार पडले.
शिरूर तालुक्‍याचे प्रवेशद्वार लोकसंख्येच्या दृष्टीने व पंचक्रोशीतील एक मोठी ग्रामपंचायत म्हणून कोरगाव भीमा ग्रामपंचायतकडे पाहिले जाते. 15 हजारच्या आसपास अधिकृत व भाडेकरू नागरिक राहत आहे. सुमारे 32 कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहे. यामध्ये स्वच्छता, आरोग्य, दिवाबत्ती, पाणीपुरवठा आदी विभागातील कामगार वर्ग आहे. सर्व कामगार आपल्या गावचेच आहेत. सर्वांनाच पगार व दुप्पट बोनस देऊ फिट! पण कामचुकार पणा न करता कामही करा नीट! असे उपसरपंच जितेंद्र गव्हाणे-पाटील यांनी सांगितले. यावेळी सरपंच संगीता कांबळे, उपसरपंच शारदा गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस, माजी उपसरपंच जितेंद्र गव्हाणे, नितीन गव्हाणे, आशा काशीद, ग्रामपंचायत सदस्य रमेश शिंदे, सुरेंद्र भांडवलकर, पूजा भोकरे, मालन साळुंखे, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक फडतरे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)