कोरेगाव भीमा खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

शिक्रापूर-कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे दारू फुकट दिली नाही म्हणून माजी उपसरपंच व त्याच्या साथीदारांनी एकाला रिव्हाल्वरने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधार गणेश फडतरे व इतर तिघे फरार झाले आहे.
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे रोहिदास उंद्रे यांच्या मालकीच्या असलेल्या श्री वाईन्सचे व्यवस्थापक महेश शांताराम उंद्रे यांना कोरेगाव भीमाचे माजी उपसरपंच गणेश भाऊसाहेब फडतरे, आकाश अनिल गव्हाणे, मनोज पवार, इंगळे (संपूर्ण नाव माहीत नाही) तसेच एक अनोळखी व्यक्‍ती अशा पाच जणांनी येऊन महेश उंद्रे हे श्री वाईन्स शॉपीच्या काउंटरवर असताना त्यापैकी गणेश फडतरे याने काउंटरवर येऊन महेश याला मी पाठविलेल्या पोरांना दारू का देत नाही, असे म्हणून महेश याला शिवीगाळ दमदाटी केली. यावेळी गणेश फडतरे याने महेशला शर्टाची कॉलर पकडून बाहेर ओढत आणले. त्याच्या जवळील रिव्हाल्वरने डोक्‍यात, तोंडावर मारून जखमी केले. तुला आता संपूनच टाकतो, असे म्हणत महेशवर रिव्हाल्वर रोखली. त्यावेळी गणेशच्या सोबत आलेल्या चार जणांनी महेश याला पकडून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी वाईन शॉपीमधील कामगारांनी महेशला मारेकऱ्यांच्या तावडीतून सोडविले. त्यावेळी गणेश फडतरे व त्याचे साथीदार त्यांनी आणलेल्या स्विफ्ट कारमधून पळून गेले.
याबाबत जखमी झालेल्या महेश शांताराम उंद्रे (वय 38, रा. मांजरी खुर्द, ता. हवेली) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न, मारहाण शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले होते. या गुन्ह्यातील आकाश गव्हाणे व मनोज पवार यांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली असून त्यांना शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. 23 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मुख्य सूत्रधार माजी उपसरपंच गणेश फडतरेसह इतर दोघे फरार झाले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे हे करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)