कोरेगाव भीमासाठी 229 पीएमपी बसेस

ठिकठिकाणी तपासणी पथके, अधिकाऱ्यांची नियुुक्ती

पुणे – कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी संभाव्य गर्दी विचारात घेता पीएमपीने जादा बसेसचे नियोजन केले आहे. पुण्याहून तळेगाव मार्गावरील नियोजित 26, आळंदी ते वाघोली 4, केंदूर एक, वाघोली ते न्हावीसांडसदरम्यान एक, याव्यतिरीक्त 47 जादा आणि जिल्हा प्रशासनाला प्रासंगिक करारावर देण्यात आलेल्या 150 बसेस मिळून एकूण 229 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरवर्षी 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा परिसरातील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. या पार्श्‍वभूमीवर हे नियोजन करण्यात आले आहे. या दिवशी (दि.1) नगर रोडवरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याने सदर दिवशी मनपा ते तळेगाव ढमढेरे या मार्गावरील नियोजित 26 बसेसचे संचलन पेरणेफाट्यापर्यंतच ठेवण्यात येणार आहे. तसेच, वाघोली ते केंदूर मार्गावरील नियोजित बसचे संचलनही पेरणेफाट्यापर्यंतच सुरू राहील.

या दिवशी मार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता 12 वा मैल विठ्ठलवाडीच्या पुढे (अप), जनकबाबा दर्गा तुळजाभवानी जकात नाका (डावून) याठिकाणी चेकनाका (चेकपोस्ट) करण्यात आलेले असून दिवसभर तिकीट तपासणी पथक नियुक्‍त करण्यात आले आहे. तसेच, बसेस संचलनावर नियंत्रणासाठी पेरणे टोलनाका, कोरेगाव भीमा नदीपलीकडील वढू चौक, मनपा बसस्थानकावर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

…येथून सुटतील जादा बसेस
पेरणे फाटा टोलनाकापर्यंत जाण्यासाठी ससूनरोड मोलेदिना बसस्थानक येथून 25, मनपाभवन/डेंगळेपूल येथून 11, दापोडी मंत्रीनिकेतन येथून 2, कै. शांताबाई ढोलेपाटील मनपा शाळा क्रं 17 येथून 2, अप्पर डेपो येथून 4, आंबेडकर चौक (पिंपरी) येथून 3 अशा मिळून एकूण 47 जादा बसेस सोडण्यात येतील. या बसेसाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून प्रौढ, लहान गटानूसार तिकीटदर निश्‍चित करण्यात आला आहे.
 
… प्रासंगिक करारावरील मोफत बसेस
या मार्गावरील प्रवाशांसाठी जिल्हा प्रशासनाला 150 बसेस प्रासंगिक करारावर देण्यात आल्या आहेत. यापैकी शिक्रापूर फाटा ते कोरेगाव भीमा-वढूफाटा चौक यासाठी 62, चाकण रोड ते कोरेगाव भीमा वढूफाटा चौक यासाठी 30, वढूफाटा ते इनामदार हॉस्पिटल वढूरोड यासाठी 8 अशा एकूण 100 बसेस संचलन होणार आहे. हे संचलन मोफत असणार आहे. त्याचप्रमाणे पेरणे फाटा टोलनाका ते विजयस्तंभ या मार्गावर इतर सर्व वाहनांना रस्त्यावरुन ये जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी तुळापूरफाटा ते पेरणेफाटा टोलनाकादरम्यान पीएमपीच्या 50 बसेसमार्फत मोफत सेवा देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)