शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील एका कुटुंबातील महिलेचा अज्ञाताने विनयभंग केल्याची घटना मंगळवारी (दि.29) रात्री घडली आहे. याबाबत पीडित महिलेने पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, पीडित महिलेच्या घरातील पुरूषमंडळी कामानिमित्त पुण्याला गेले होते. त्यामुळे पीडित महिला घरी होती. रात्री आठच्या सुमारास घरातील एक महिला लहान मुलाला खाऊ आणण्यासाठी गेली. तर घरातील दुसरीही महिला घराबाहेर आली त्यानंतर ती पुन्हा घराकडे निघाली. याचवेळी अज्ञात व्यक्‍ती घरा घुसला आणि पीडित महिलेचे तोंड दाबून तिचा विनयभंग केला. तेवढ्यात दरवाजाचा आवाज आल्याने “तो’ व्यक्‍ती मागील दरवाजाने पळून गेला. हा घडलेला प्रकार पीडित महिलेने घरातील पुरूष मंडळींना सांगितला. त्यानुसार त्यांनीश शिक्रापूर पोलीस ठाणे गाठून हा प्रकार पोलिसांना सांगितला. याबाबत पीडित महिलेने फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञाताविरूध्द गुन्हा नोंदवला आहे. याचा तपासर सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले करीत आहेत. कोरेगाव भीमा येथील दंगलीतील साक्षीदार असलेल्या पूजा सकट हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच अशाप्रकारे कोरेगाव भीमात होत असलेल्या विनयभंगच्या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)