कोरेगाव भीमात दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद

चार दुचाकी हस्तगत : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीणची कामगिरी

शिक्रापूर, दि. 23 (वार्ताहर)- कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीणच्या पथकाने मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीतील चार आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून बुलेटसह एकूण चार मोटरसायकल हस्तगत केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या आदेशाने एक जानेवारी रोजी पेरणेफाटा विजयस्तंभ येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यात स्थानिक गुन्हे विभागाची पथके नेमण्यात आलेली आहेत. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेले पोलीस उपनिरीक्षक जीवन राजगुरू, दयानंद लिम्हण, चंद्रकांत झेंडे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, शब्बीर पठाण, दत्ता तांबे, चंद्रशेखर मगर, अक्षय नवले यांचे पथक दि. 21 डिसेंबर रोजी पुणे- नगर रोडवर पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना कोरेगाव भीमा बाजार मैदान येथे चारजण चोरीच्या मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती एका बातमीदारामार्फत बातमी मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने त्या ठिकाणी सापळा लाऊन बिगर नंबरचे मोटरसायकलवर संशयास्पदरित्या थांबलेल्या चार युवकांना ताब्यात घेतले. यावेळी पथकाने गणेश यादव गायकवाड (वय 26, रा. वनकुटे, ता. पारनेर, जि. अहमदनगर), अहमद हसमुद्धिन शेख (वय 21, रा. पिंपळगाव तुर्क, ता. पारनेर, जि. अहमदनगर), मयुर बाळासाहेब किनकर (वय 22, रा. शिक्रापूर, ता. शिरूर, मूळ रा. किनी ता. पारनेर जि. नगर) तसेच सौरभ बन्सी गुळवे (वय 23, रा. शिक्रापूर, ता. शिरूर, मूळ रा. रहिमपूर, ता. संगमनेर जि. नगर) यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील बुलेट, पल्सर, स्प्लेडर प्रो व सुझुकी ऍक्‍सेस अशा एकूण दोन लाख अठरा हजार रुपयांच्या चार मोटरसायकलसह ताब्यात घेतल्या. याबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी त्या सुपे (ता. बारामती), आंबेवाडी कान्हे, वडगाव मावळ येथून चोरी केल्याची कबुली दिली आहे. याबाबत वडगाव मावळ व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या पथकाने अटक केलेल्या या आरोपींना पुढील कारवाईसाठी वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे. तर सध्या अटक केलेल्या आरोपींकडून अजूनही मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके करीत आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)