कोरेगाव भीमात चोख बंदोबस्ताबद्दल संदीप पाटील यांचा सत्कार

शिक्रापूर- कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे गेल्यावर्षी झालेल्या जातीय दंगलीमध्ये कोरेगाव भीमा व सणसवाडी येथील व्यवसायिकांना मोठी झळ बसून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यंदा पेरणे फाटा येथील विजय रणस्तंभास अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने आले होते. येथे जातीय सलोख्याचे वातावरण कसे राहील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रत्यक्षात कोरेगाव भीमाच्या ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन अनुयायांचे गुलाबपुष्प व शुद्ध पाणी देऊन स्वागत केले. पोलिसांनी प्रत्येक चौकांमध्ये चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे सर्व समाजामध्ये निर्भय वातावरण तयार झाले होते. कोरेगाव भीमा येथे पोलीस अधीक्षक संदीप पाटील जातीने परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. याचबरोबर अनेक अधिकारी व शेकडो पोलीस अनुयायांना त्यांच्या बसपर्यंत पोहोचण्यास मदत करत होते. पोलिसांनी केलेल्या उत्तम नियोजनामुळे कोरेगाव भीमा येथील ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचा सत्कार केला. यावेळी माजी सरपंच विजय गव्हाणे, संजय काशीद, माजी उपसरपंच अरविंद गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस, राजेंद्र गावडे, भाजपाचे तानाजी ढेरंगे, केशव फडतरे यांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचा सत्कार केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)