कोरेगाव भिमात बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू

शिक्रापूर – कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे गुरुवारी (दि. 17) सायंकाळच्या सुमारास कोंढापुरी येथील तैकीशा इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड या कंपनीतून कामगारांना सोडण्यासाठी जाणाऱ्या बसची धडक बसून एका महिलेचा मृत्यू झाली असल्याची घटना घडली आहे. अंजना गणपत भंडारी (रा. वढू बुद्रुक ता. शिरूर) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोंढापुरी येथील तैकीशा इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड या कंपनीतून पुणे येथे कामगार सोडण्यासाठी जाणारी (एमएच 12 एचबी 1997) ही बस पुणे नगर रस्त्यावर कोरेगाव भिमा या ठिकाणी आली असता येथे रस्ता ओलांडत असलेल्या भंडारी यांना बसने धडक दिल्याने त्यांना उपचारासाठी वाघोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मंगेश गुलाब भंडारी (रा. वढू बुद्रुक ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, ही बस पोलिसांनी ताब्यात घेतली असून बसचा चालक फरार झाला आहे. असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जगदाळे हे करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)