कोरेगाव पार्क परिसरात वाहतूक व्यवस्थेत बदल

पुणे – सुरळीत वाहतुकीसाठी कोरेगाव पार्क परिसरातील रस्त्यांवरील वाहतूक नियमांत बदल करण्यात आला आहे. काही मार्गांवर नो पार्किंग, सम- विषम पार्किंग करण्यात आले असून यासंदर्भात कुणाला हरकत असल्यास दि. 7 जानेवारीपर्यंत वाहतूक विभागाकडे संपर्क करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

कोरेगाव पार्क लेन नं. 4 येथे पी-1 , पी-2 पार्किंग करण्यात येत आहे. ढोले पाटील रस्त्यावर सिद्धार्थ पथावर पी-1, पी-2 करण्यात येत आहे. मंगलदास रोडवर रस्त्याच्या दक्षिणेस ब्लु डायमंड चौक ते नेलर रोडदरम्यान चारचाकी वाहनांना समांतर पार्किंग करण्यात येत आहे. नेलर रोड ते मोबाज चौकपर्यंत नो-पार्किंग, मंगलदास रोडवर मोबाज चौक ते मेट्रो हाऊस कॉर्नरपर्यंत नो पार्किंग. तर, ठक्कर रोड कॉर्नरवर 10 मीटर मोटारसायकल पार्किंग करण्यात येत आहे. नेलर रोड कॉर्नर ते ब्लू डायमंड चौकदरम्यान चारचाकी वाहनांना समांतर पार्किंग करण्यात येत आहे. तर, ठक्कर रोडवर रोडच्या दोन्ही बाजूस नो पार्किंग करण्यात येत आहे, अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)