कोरेगाव : एसपींची ‘प्रेरणा’ अन ‘कट्टेंचा’ जुगार्‍यांना दणका

सातारा,प्रतिनिधी

-Ads-

कोरेगाव येथे आवैध मटका अड्यावर उपविभागीय अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी टाकलेल्या छाप्यात नऊ मटका बुकींना अटक केली. जिल्हा पोलिस प्रमुखांनी कोणाचाही मुलाहिजा न राखता कायद्याला चुकीचे असेल त्याला अाळा घालण्याचे आदेश दिलेत. त्यामुळेच एसपींची ‘प्रेरणा’ मिळाल्यानेच ‘कट्टेंनी’ कोरेगावातील जुगार्‍यांना पोलिसी खाक्या दाखवल्याचे बोलले जाते.

अटकेतील जुगार्‍यांकडून १० लाख ५६ हजार रुपयांचा मुद्दे माल पोलिसांनी जप्त केला. दरम्यान अंधाराचा फायदा घेत एकाने पलायन केले.कोरेगाव शहरातील कृष्णनगर कॉलनी येथे एका बंदिस्त घरात मटका घेणारे दहा मटकाबुकी दिवसभरात मटका घेतलेली रक्कम मोजत असल्याची माहिती कोरेगाव उपविभागीय पोलिस अधिकारी प्रेरणा कट्टे यांना मिळाली होती.

त्यानुसार रहिमतपूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक व्ही. बी. जगदाळे, पो. ना. एस. डी. नाळे, पो. काँ. महेश पवार, पो. काँ. विनोद पवार यांच्या पथकाला घेत कट्टे यांनी कारवाई केली.बोलावून घेतले. या सहकाऱ्यांच्या साहाय्याने छापा टाकला. यावेळी नऊ मटका बुकींना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर एक संशयीत फरार झाला. यावेळी पोलिसांनी रोख ९ लाख ३२ हजार आणि १ लाख २४ हजार रुपयांच्या दुचाकी आणि मोबाईल जप्त केले आहेत.

शाहरुख हजरत काझी, रियाज पीर महम्मद काझी, अनिल रज्जाक शेख, आरबाज अशपाक शेख, सलीम हजरत काझी, मंगेश हिंदुराव मदने, मनोज किसन पार्टे, सुनिल अनिल बोतालजी, राहुल किसन पार्टे अशी अटक केलेल्या जुगार्‍यांची नावे आहेत.तर उमेश ननावरे व संतोष मल्हारी भंडलकर हे फरार झाले आहेत.

What is your reaction?
75 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)