कोरेगावात स्वच्छ सर्वेक्षणाकडे 11 नगरसेवकांची पाठ

विकासाला खो घालणाऱ्यांना जनता माफ करणार नाही : राजाभाऊ बर्गे

कोरेगाव, दि. 1 (प्रतिनिधी) – स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमात कोरेगांव नगरपंचायतीने सहभाग घेतला असून त्याची ्‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌घोषणा करण्यासाठी आयोजित सर्वसाधारण सभेला 11 सदस्यांनी अनुपस्थिती दाखवून चक्‍क स्वच्छ कोरेगांव उपक्रमालाच विरोध दर्शविल्याचे चित्र आज पहायला मिळाले.
कोरेगावचे नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली आज नगरपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विशेष सभेचे आयोजन केले होते. या सभेकडे राष्ट्रवादीच्या 8 नगरसेवकांसह कॉंग्रेसच्या 3 नगरसेवकांनी चक्‍क सामुहिक दांडी मारून स्वच्छता सर्वेक्षणाकडे पाठ फिरवली. या सभेला नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्यासह कॉंग्रेसचे नगरसेवक बाळासाहेब बाचल, महेश बर्गे, सौ. साक्षी बर्गे, सौ. शुभांगी राहुल बर्गे व सौ. पुनम मेरुकर हे सहा सदस्य व मुख्याधिकारी पुनम कदम उपस्थित होत्या.
सभेनंतर माहिती देताना नगराध्यक्ष म्हणाले, विरोधकांनी विद्यमान लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक अडवणूक करण्याचा सपाटा लावला आहे. संपूर्ण देशभर स्वच्छतेसाठी शहरी अभियान राबविले जात आहे. उद्यापासून देशभर महात्मा गांधी यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. या पार्श्‍वभूमिवर कोरेगांव नगरपंचायतीने सोमवारी विशेष सभेचे आयोजन करुन स्वच्छ सर्वेक्षणाची घोषणा केली. वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रम व प्रबोधनपर कार्यक्रमाचीही यावेळी घोषणा करण्यात आली. विशेष सभेची नोटीस सर्व सदस्यांना मिळाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्वत: दूरध्वनीवरुन नगरसेवकांना सभेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. शहर स्वच्छतेच्या दिशेने जात असताना उपक्रमाला व नगरपंचायतीने हाती घेतलेल्या विकासाला खो घालण्याचा प्रयत्न लोकप्रतिनीधींकडून सुरू आहे. त्यांचा हा प्रयत्न आजच्या सभेने उधळून लावला असून शहराच्या विकासाला खिळ घालणाऱ्या प्रवृत्तींना कोरेगांवची जनता कदापी माफ करणार नाही, असेही नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे याप्रसंगी म्हणाले.

-Ads-

स्वच्छ प्रभागाला बक्षीसांची घोषणा
नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमात भाग घेतला असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शहरातील सर्व प्रभागांसाठी स्वच्छ प्रभाग स्पर्धेची घोषणा नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी केली असून पहिल्या तिन क्रमांकाना अनुक्रमे 15 लाख, 10 लाख व 7 लाखाचे प्रोत्साहनपर बक्षीसही जाहीर करण्यात आले. तर आदर्श स्वच्छता दूत, आदर्श कर्मचारी, आदर्श सामाजिक संस्था यांच्यासाठी विशेष बक्षीस देण्यात येणार आहे.

नगरपंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस
कोरेगांव नगरपंचायतीच्या 103 कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानातून दिवाळी बोनस म्हणून 10 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. या विषयासह एकूण 34 विषयांवर या सभेत चर्चा करण्यात येवून बहुतांशी सर्वच विषय एकमताने मंजूर करण्यात आले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)