कोरेगावात साडेचार लाखांचा गुटखा जप्त

सातारा-  कोरेगाव तालुक्‍यातील शिरंबे गावाजवळ पोलिसांनी साडेचार लाखांचा गुटखा जप्त केला. शुक्रवारी पहाटे कोरेगाव,पुसेगाव,रहिमतपूर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. यावेळी सर्वण बिष्णोई (मुळ रा. राजस्थान,सध्या रा. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चार लाखाचा गुटखा व एक स्कोडा कार पोलिसांनी जप्त केली.

शुक्रवारी पहाटे कोरेगाव उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस उपनिरीक्षक कुंभार हे रात्रगस्त घालत होते. त्यावेळी त्यांना एक स्कोडा कार संशयास्पदपणे फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्या कारला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने कार थांबवली नाही. कार पुसेगावच्या दिशेने गेल्याने कुंभार यांनी पुसेगाव पोलिसांना याची माहिती दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुसेगावचे स.पो.नि.विश्‍वजीत घोडके हे कारच्या पाळतीवर थांबले होते. काही वेळातच एक कार समोरून आल्याने त्यांनी ती थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने कार पुन्हा कोरेगावच्या दिशेने वळवुन पोलिसांना गुंगार दिला. दरम्यान कोरेगाव पोलिसांची गाडी समोरून आल्याचे दिसताच चालकाने पोलिस गाडीला झासा मारून कार रहिमतपूरच्या दिशेने नेली. त्यानंतर कोरेगाव पोलिसांनी रहिमपतपूर पोलिसांना त्या कारची माहिती दिल्याने पोलिस उपनिरीक्षक जगदाळे कारच्या पाळतीवर थांबले होते. त्यांना पाहताच चालकाने कार शिरंबे गावात घुसवण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठे वळण असल्याने चालकाला अंदाज न आल्याने कार पलटी झाली. यावेळी कारमधील दोघे पळुन गेले. तर सर्वण बिष्णोई पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी कारची झडती घेतली. त्यावेळी त्यांना साडेचार लाखाचा गुटखा सापडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)