कोरेगाव, दि. 10 (प्रतिनिधी)- येथील जुन्या पेठेतील दत्तमंदिराजळ बंद घराचे कडी व कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यानी सुमारे 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. यामध्ये सोन्याचे दागिने रोख रक्कमेचा समावेश आहे. घरातील सर्वजण गावाला गेल्याचे बघून चोरट्यांनी डाव केल्याचे समजते.
याबाबत मानसिंग कृष्णराव नाळे वय 63 रा.दत्तमंदिराजवळ जुनी पेठ, कोरेगाव यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि.7 ते 10 सकाळी 8 वाजेपर्यंतच्या वेळेत अज्ञात चोरट्यानी हा डाव केल्याचे म्हटले आहे. यामध्ये 15 हजार रुपयेचे सोन्याचे गंठण, 20 हजारचे मनी मंगळसूत्र, 15 हजार रुपयांचे कानातील टॉप्स, 7 हजार रुपयांची कर्णफुले, 2 हजार रूपयांचे चांदीचे पैंजण, 10 हजार रुपये रोख रक्कमेचा समावेश आहे. या घटनेची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)