कोरेगावातील सर्वांनी एकत्र या मी तुमच्या पाठीशी आहे : खा. उदयनराजे भोसले

एकसळ ः कार्यक्रमात बोलताना खा. श्री. छ. उदयनराजे भोसले शेजारी कार्यकर्ते व पदाधिकारी.

कोरेगाव, दि. 10 (प्रतिनिधी) – “आमच्या मुळे तुम्ही नसुन, तुमच्या मुळेच आम्ही खासदार, आमदार आहोत. याची जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे. परंतु त्याची परतफेड कुणी लोकांच्यावर दहशत निर्माण करून करत असेल तर त्यांची ही दहशत मोडून काढली जाईल. प्रत्येकाच्या घरात काठ्या- कुऱ्हाडी आहेत. त्या बाहेर काढण्यासाठी कोरेगाव करांना सांगायची गरज नाही. कोरेगावातील सर्वांनी एकत्र या मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही घ्याल तो निर्णय मला मान्य आहे. असा गर्भित इशारा कोरेगाव तालुक्‍यात येवून खा. उदयनराजे भोसले यांनी कोरेगावचे विद्यमान आमदार शशिकांत शिंदे यांना दिला.
कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे गेली नऊ वर्षे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या आमदार शशिकांत यांनी मतदार संघात विकास कामे केली नाहीत. गावोगावचा विकास रखडविला. ज्यांनी सलग दोन विधानसभा निवडणुकीवर तालुक्‍यातील इतर सर्व निवडणुकीत आ. शशिकांत शिंदे यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे निष्ठेने काम केले. त्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना राजकारणातून सार्वजजिकजिवनातून उध्वस्त करण्याचे काम आ. शशिकांत शिंदे यांनी केले. असे आरोप करत, विद्यमान नेतृत्व बदलण्यासाठी स्वाभिमानी विचार मंचची स्थापना केला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विधान सभेसाठी राष्ट्रवादी पक्षाने स्थानिक कार्यकर्त्याला संधी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली . खा.भोसले यांनी या मागणीसाठी कोरेगाव तालुक्‍यात बैठका घेतल्या. याच स्वाभिमानी मंचाची बैठक एकसळ ता. कोरेगाव येथील एकसळ येथे पार पडली. या बैठकीला खा. उदयनराजे यांनी हजेरीलावून स्वाभिमानी विचार मंचच्या कार्यकर्त्यांना पाठिंबा दिला. उपस्थितांना मार्गदर्शन केले.
खा. उदयनराजे पुढे म्हणाले, कोरेगाव तालुक्‍यात पाणी आहे, उत्तम-शेती आहे, साखर कारखाना आहे. कोरेगाव तालुक्‍यातील लोकांची परिस्थिती उत्तम आहे. परंतु कोरेगाव तालुक्‍यातील लोक एकत्र येत नाहीत. हि माझी खंत आहे. सर्वांनी एकत्र यावे असे आव्हान करून आपण बाहेरचे नेतृत्व का स्विकारायचे? विधानसभे पाठोपाठ आता जिल्हा परिषदेलाही बाहेरचे उमेदवार कोरेगाव तालुक्‍यात येवू लागले आहेत. या पुढे कोणाच्याही दहशती खाली अन्याय सहन करायची गरज नाही. दहशतवाद संपविण्यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे. पुढील काळात कोरेगाव तालुक्‍यात कोणाचीही दंडीलशाही, टेंन्डरशाही, कमिशन राज चालु देणार नाही.
साताऱ्यात झालेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा उल्लेख करताना खा. उदयनराजे भोसले म्हणाले, बरे झाले माझ्या वाढदिवसाला आमदार आले नाहीत, नाही तर समोरची गर्दी बघून म्हणाले असते की ही गर्दी आमच्यामुळेच आहे. माझ्यावर असलेल तुमचे प्रेम हे माझ्यासाठी पुरेस आहे. एकत्र रहा, तुम्ही घेतलेल्या निर्णयावर ठाम रहा मी तुमच्या पाठीशी आहे.
एकसळ गावा मध्ये गेल्या दहा वर्षात गावच्या एका बंधाराच्या आणि विठ्ठल मंदिराच्या सभा मंडपा व्यतिरीक्त एकही मोठे विकासकाम मार्गी लागले नाही. राष्ट्रवादीत असूनही गावच्या अंतर्गत रस्त्यांचे आणि अंडरग्राऊंड गटर्स चे प्रश्न गेल्या दहा वर्षात सुटले नाहीत, अशी खंत एकसळ गावचे हिंदुराव भोसले यांनी व्यक्त केली.
कोरेगावचे विद्यमान आमदार विकास कामांचे नारळ फोडतात. परंतु ती विकास कामे मार्गी लागत नाहीत. निवडणूकीत निष्ठेने काम केलेल्या कार्यकर्त्याला किंमत देत नाहीत. त्यामुळे पुढिल काळात राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाने पुन्हा सध्याचा उमेदवार आम्हाला देवू नये. अन्यथा आम्हाला आमच्या स्वाभिमानी विचार मंचच्या माध्यमातून वेगळा उमेदवार विधानसभेसाठी द्यावा लागेल. असा इशारा राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते नाना भिलारे यांनी यावेळी दिला.
सलग वर्षे राष्ट्रवादीचे कार्य निष्ठेने करणाऱ्या कार्यकर्त्याचा राजकीय अंत विद्यमान नेतृत्वाने एका क्षणात केला आहे. अशी खंत कोरेगाव बाजार समितीचे माजी चेअरमन अजय बापू कदम यांनी व्यक्त केली. खा. शरद पवार यांच्याशी थेट संपर्क असणाऱा कार्यकर्ता संपवण्याचे कार्य विद्यमान आमदारांनी केले. अशी टिका राष्ट्रवादी पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष विठ्ठलराव कदम यांनी केली. अनिल बोधे यांनी विद्यमान आमदारांच्या वर टिकेची झोड उठवली. या वेळी जिल्हा परिषदेच्या माझी उपाध्यक्ष रवि साळूंखे, भागवानरा जाधव, पोपटराव करपे, उप-नगराध्यक्ष जयवंत पवार, नारायणराव फाळके, टी. जे. सणस, विजयसिंह शिंदे, प्रदिप फाळके सह मोठ्या संखेने राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध गावचे ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. प्रास्थाविक पांडुरंग भोसले यांनी केली. कार्यक्रमाचे आभार सुनिल खत्रींनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)