कोरेगावातील अपघातात युवकाचा मृत्यु; दोघे जखमी

कोरेगाव, दि. 9 (प्रतिनिधी) – कोरेगाव-पुसेगाव रस्त्यावर कुमठे फाटा परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या दोन मोटारसायकल आणि ट्रॅक्‍टर-ट्रॉली अपघातात भोसे, ता. कोरेगाव येथील युवक उदय अधिक माने याचा जागीच मृत्यु झाला तर त्याचे दोन मित्र गंभीररित्या जखमी झाले. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, की भोसे येथील उदय माने हा मित्र महेश माने व अमित कांबळे यांच्यासमवेत एका मोटारसायकलवरुन रात्री 10.30 च्या दरम्यान कोरेगावकडे येत होता. त्याचवेळी समोरुन ऊसाने भरलेली ट्रॅक्‍टर-ट्रॉली चिमणगावकडे निघाली होती. तेवढ्यात एक भरधाव वेगात मोटारसायकल घेऊन अज्ञात व्यक्‍ती ट्रॅक्‍टरला ओव्हरटेक करत होती, या मोटारसायकलची धडक समोरुन येणाऱ्या मोटारसायकलला बसली आणि उदय माने व त्याचे मित्र रस्त्यावर पडले. मोटारसायकलस्वार हा वेगातच निघून गेला. उदय याच्या डोक्‍यावरुन ट्रॅक्‍टर-ट्रॉलीचे चाक गेल्याने, त्याचा जागीच मृत्यु झाला. अन्य दोघांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याप्रकरणी अतुल आनंदराव माने याने अज्ञात मोटारसायकलस्वाराच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक संतोष मिसळे तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)