कोरेगावमध्ये विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

 

कोरेगाव, दि. 4 (प्रतिनिधी) – कोरेगाव शहरानजिक सद्‌गुरूनगर येथील विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली.
याबाबत माहिती अशी, रुपाली राजेंद्र काळे (वय 36) रा. सद्‌गुरूनगर या पती आणि दोन मुलींना घेवून माहेरी यात्रेसाठी खडखडवाडीत आल्या होत्या. सायंकाळी 6:30च्या सुमारास त्यांनी लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये कोरेगाव शहरात प्रॅक्‍टिस करत असलेल्या डॉक्‍टरचा उल्लेख आहे. संबंधित डॉक्‍टरवर गुन्हा नोंदवला जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर रुपाली हिच्यावर काळेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)