“कोरेगांव भीमा नियोजनासंदर्भात प्रशासनाकडून दिशाभूल’

पुणे – कोरेगांव भीमा येथे 1 जानेवारी रोजी होणाऱ्या क्रांतिस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची तयारी अजून पूर्ण झालेली नाही. यासंदर्भात पाठपुरावा करुनही त्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली नाही. या नियोजनाच्या संदर्भात प्रशासन दिशाभूल करत आहे, असा आरोप रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे.

यासंदर्भात माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप करण्यात आला. राष्ट्रीय सचिव संजीव बावधनकर, विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे, कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष युवराज बनसोडे, जिल्हाप्रमुख संजय देखणे, शहर प्रमुख बाळासाहेब चव्हाण, विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख विशाल म्हस्के, पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख सुनिल ढमाळ, संतोष सपकाळ, राहूल साळवे, प्रदीप धिवार आदी पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

आंबेडकर म्हणाले, “या कार्यक्रमाची तयारी करता सर्वपक्षीय नियोजनाची बैठक लावण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची रिपब्लिकन सेनेच्या शिष्टमंडळाने समक्ष भेट घेऊन लेखी मागणी केली होती. मात्र, तीन ते चारवेळा बैठका होऊनही याबाबत तयारी झालेली नाही, याला प्रशासनच सर्वस्वी जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
2 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)