कोरीयातील तणावामुळे शेअर बाजार निर्देशांक घट

मुंबई- उत्तर कोरीयाने आज जपानवरून क्षेपणास्त्र सोडल्यामुळे जागतीक पातळीवर तणाव निर्माण झाला आणि शेअर बाजार निर्देशांक कमी झाले. त्याचा परिणाम भारतातील शेअर बाजारावरही होऊन भारतीय शेअर बाजारातील निर्देशांक कमी झाले. आज जागतीक बाजाराबरोबरच भारतातील सोने आणि चांदीच्या बाजारातही भाववाढ झाली.

बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 362 अंकानी कमी होऊन 31388 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 116 अंकानी कमी होऊन 9800 च्या खाली म्हणजे 9796 अंकावर बंद झाला.
आज बाजार उघडल्याबरोबरच जागतीक नकारात्मक संकेतामुळे सेन्सेक्‍स 250 अंकानी कमी झाला होता. उर्जा, बॅंकीग, तेल आणि नैसर्गीक वायू क्षेत्रासह सर्वच क्षेत्राना विक्रीचा फटका बसला. कोरीयातील तणावाचा सर्वात जास्त फटका आज आशियायी शेअर बाजाराना बसला. युरोपातील शेअर बाजारही दबावाखाली होते. कालच भारत आणि चीन सरहद्दीवरील तणाव निवळल्यामुळे शेअर बाजारातातील वातावरण खरेदीसाठी पूरक झाले असतांनाच आता कोरीयातील परिस्थिती चिघळली आहे. द कोरीया आणि अमेरीकेच्या लष्कराचा संयुक्त सराव सुरू आहे.

त्याला उत्तर म्हणून उत्तर कोरीयाने क्षेपणास्त्र सोडले. ते जपानवरून पाचशे किमी वरून जाऊन पॅसिफीकमधील एका जपानच्या बेटाजवळ पडले. आज सरकारने एनटीपीसीची निर्गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. याला संस्थागत गुंतवणूकदाराकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र आज या कंपनीच्या शेअरच्या भावात 5 टक्‍क्‍यानी घट झाली.
दरम्यान काल शेअर बाजार निर्देशांक वाढूनही परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 124 कोटी रूपयाच्या शेअरची विक्री केली. तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 476 कोटी रूपयाच्या शेअरची खरेदी केली.
उत्तर कोरीयातील तणावाचा चलन बाजारावरही परिणाम होण्याची शक्‍यता असून गुंतवणूकदारांचे तिकडेही लक्ष राहणार असल्याचे ब्रोकर्सनी सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)