कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा: सायना नेहवालचे आव्हान संपुष्टात

सेऊल: भारताची ऑलिम्पिक कांस्यविजेती खेळाडू सायना नेहवालचे येथे सुरू असलेल्या कोरिया ओपन वर्ल्ड टूर सुपर-500 बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान उपान्त्यपूर्व फेरीतील पराभवामुळे संपुष्टात आले.

महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत जपानच्या तृतीय मानांकित नोझोमी ओकुहाराविरुद्ध तब्बल चार मॅचपॉइंट दवडणाऱ्या सायनाने विजयाची संधीही गमावली. ओकुहाराने अखेरच्या क्षणी आपला खेळ उंचावला आणि 15-21, 21-15, 22-20 अशा विजयाची नोंद करताना उपान्त्य फेरीत धडक मारली. भारताचा अव्वल पुरुष खेळाडू समीर वर्मा आणि युवा महिला वैष्णवी रेड्डी यांचे स्पर्धेतील आव्हान सलामीच्याच फेरीत संपुष्टात आले होते. ओकुहाराने हा सामना 59 मिनिटांत जिंकला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वास्तविक पाहता या सामन्यापूर्वी पाचव्या मानांकित सायना नेहवालकडे ओकुहाराविरुद्ध 6 विजय आणि 3 पराभव अशी आघाडी होती. पहिली गेम 21-15 अशी जिंकून सायनाने सुरुवातही चांगली केली होती. परंतु ओकुहाराने दुसऱ्या गेममध्ये 4-1 अशी आघाडी घेत सायनावर दडपण आणले. सायनाने 8-8 अशी बरोबरी साधली. परंतु ओकुहाराने 14-9 अशी आघाडी घेत ही गेम जिंकून बरोबरी साधली. अखेरच्या गेममध्ये सायना 20-16 अशी आघाडीवर होती. परंतु ओकुहाराने सलग सहा गुण जिंकत सायनाला चकित केले व आश्‍चर्यकारक विजयाची नोंद केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)