कोयनेमध्ये 59.47 टीएमसी पाणीसाठा

धरण क्षेत्रात पावसाचा जोर :खरीपाची पेरणी 73 टक्‍के पुर्ण
सातारा,दि.13 प्रतिनिधी- जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये गतीने वाढ होत आहे.सातारा जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून शुक्रवारी कोयनेमध्ये 59.47 टीएमसी इतका साठा होता. त्याचबरोबर जिल्ह्यात खरीपाची पेरणी 73 टक्‍क्‍यापर्यंत पोहचलीअसून पावसाचा जोर कायम राहिल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे.जिल्ह्यात आतापर्यंत 2231 मिलीमीटर पाउस झाला आहे.
सध्या कोयना धरण 55 टक्के भरले आहे. तर दुसरीकडे जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाने उघडीप दिली असल्याने शेतक-यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने वेळेत हजेरी लावल्यानंतर काही दिवसांची उघडीप वगळता पाऊस सतत होत आहे. गेल्या सात दिवसांपासून तर अपवाद वगळता पश्‍चिम भागात सूर्यदर्शन झालेच नाही. सतत जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे ओढे, नाले खळाळू लागले आहेत. धरणातही पाण्याची आवक वाढली असून साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा धरणात अधिक साठा आहे. कोयनानगर येथे 97 तर एकूण 1580 मिलीमीटर पाऊस झाला आहे. धोम धरण क्षेत्रात 50, कण्हेर 28 बलकवडी 70, उरमोडी 17आणि तारळी येथे 64 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर धोममध्ये 4श्र03, बलकवडी 2000 तारळी 2798आणि उरमोडीत 1492क्‍युसेक पाण्याची आवक झाली आहे. साता-यातही रविवारी सकाळी पाऊस झाला. मात्र, या पावसात जोर नव्हता. दरम्यान, पूर्व भागात गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे माळरानावर पेरणी केलेल्या पिकांना पावसाची आवश्‍यकता आहे. पावसाअभावी शेतकरी चिंतेत आहेत. सातारा शहरातही संततधार . शुक्रवारी दुपारी अर्धा तासाचा अपवाद वगळता शहरात दिवसभर संततधार सुरूच होती. शाहु पुरी मेढा रस्त्यावर एका ठिकाणी झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाल्याचे वृत्त होते . माची पेठ समर्थ मंदिर परिसर बोगदा पॉवर हाऊस परिसर येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . माची पेठेतही डोंगरालगतच्या काही भागात भराव निसटण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिक धास्तावले आहेत . सततच्या पावसाने राजवाडा सदाशिव पेठ व पोवई नाका येथील भाजी मंडईच्या स्वच्छतेच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे . सदाशिव पेठ भाजी मंडईत टाकाऊ कचरा व सडक्‍या भाज्यांच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले आहेत . येथे सफाई वेळोवेळी होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे . सातारा शहरात गेल्या चार दिवसात एकूण सरासरी 241 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 61 मिमी पावसाची नोंद झाली.

पेरणीची जिल्हा कृषी कार्यालयाकडून गुरूवारपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे. त्यामध्ये मुगाची सर्वाधिक 128 टक्के तर सोयाबीनची 100 टक्के पेरणी पुर्ण झाली आहे. त्याचबरोबर ज्वारी 78.85 टक्के, मका 78.15 टक्के, बाजरी 76. 46 टक्के, तुर 63.12 टक्के, तुर 63.12 टक्के, भुईमुग 67.21 टक्के, तीळ 25 टक्के, कारळा 39 टक्के, कापूस 13.50 टक्के, सुर्यफुल 5.16 टक्के, त्याचबरोबर ऊसाची 17 टक्के लागवड पुर्ण झाली आहे. तर धरणांमध्ये कोयनेत 60 टीएमसी, उरमोडी 5.38 टीएमसी, धोमबलकवडी 2.20 टीएमसी, धोम 5.54 टीएमसी, नीरा-देवघरमध्ये 4.50 टीएमसी, वीर 3.58 टीएमसी, तारळी 2.664 टीएमसी इतका पाणीसाठा शुक्रवारी सायंकाळ पर्यंत झाला आहे. एकूणच जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीचा वाढता जोर व त्यास पावसाची मिळत असलेली साथ पाहता शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)