कोयना @ 50….

कोयना धरण जुलैअखेर भरण्याची शक्‍यता
पाटण – कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणात येणारा पाण्याचा वेग 38670 प्रतीसेकंद असल्याने धरणातील पाणीसाठा आजअखेर 50.84 टीएमसी झाला आहे. त्यामुळे जुलै अखेर धरण भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मागील बारा तासात कोयना 58 मिली मिटर, नवजा 56 मिली मिटर, महाबळेश्वर 24 मिली मिटर पाऊस झाला आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. धो-धो पडणारा पाऊस, हिरवेगार डोंगर, डोगररागांतून कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी युवा पर्यटकांची गर्दी वाढली आहे. कोयना पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येथील रिसॉर्ट ही सज्ज झाली आहेत. कोयना पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे आता 15 ऑगस्टच्या डेटलाईन पूर्वीच धरण भरणार आहे. नवजा, कोयना या परिसरात सध्या धुवॉंधार पाऊस सुरु आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
2 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)