कोयना प्रकल्पग्रस्तांच्या गावांना सुविधा पुरविणार

राज्यमंत्री दिलीप कांबळे : हेक्‍टर अतिरिक्त जमिन परत करणार
मुंबई – कोयना प्रकल्पबाधीत गावांना नागरी सुविधा देण्यासंदर्भातील 3 कोटी 29 लाख रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता पंधरा दिवसांमध्ये देण्यात येणार असून पुनर्वसीत गावांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी विशेष बैठक बोलविण्यात येणार असल्याची ग्वाही मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. तसेच कोयना धरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जमीनीपैकी 900 हेक्‍टर जमीन शेतकऱ्यांना परत देण्याच्या दृष्टीने उचीत कार्यवाही केली जाणार असल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले.

विधानसभेत कोयना धरण प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्‍यातील अनेक गावे पुनर्वसित झालेली आहेत. परंतु पुनर्वसित गावांना सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. तसेच कोयना धरणात 25 टीएमसी पाणीसाठा वाढविण्याचा प्रस्ताव आहे. अगोदरच पुनर्वसित गावांतील शेतकऱ्यांना जमीनी परत मिळालेल्या नाहीत. तसेच मुलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे शिवसेनेचे प्रतोद व आमदार शंभुराजे देसाई यांनी लक्षवेधी सुचनेव्दारे प्रश्न उपस्थित केला होता.
लक्षवेधी सुचनेला उत्तर देताना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले, पाटण तालुक्‍यातील 54 पुनर्वसित गावांपैकी 21 गावांचे खासगी जागेवर पुनर्वसन झालेले आहे. या गावांना 18 सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने सरकारने निर्णय घेतला. परंतु त्यातील कामांची वर्गवारी केली असता 13 कामे करण्यास अडचणी येत आहे.

कोयना धरणात 25 टिएमसी पाणीसाठा वाढविण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडून सादर करण्यात आलेला आहे. यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पुनर्वसित गावांमध्ये विविध विकास कामे करण्यासाठी 3 कोटी 29 लाख रूपयाचा निधी देण्यात आला असून 15 दिवसांत निविदा काढण्यात येतील. त्याचबरोबर विशेष बाब म्हणून या गावांना सुविधा पुरविल्या जातील. टाक्‍सफोर्स निर्माण करून तातडीने प्रश्न सोडविण्यात येतील. तसेच बाळगंगा प्रकल्पातील बाधित 25 गावांचा सकारात्मक विचार केला जाईल, असे राज्यमंत्री कांबळे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)