कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

सातारा : कोयना धरण परिसरात रात्री 11 वाजण्याच्य सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याचे सांगण्यात येत आहे. यात जीवितहानीचे वृत्त नसून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
आज रात्री 10.56 वाजण्याच्या सुमारास कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के कोयना धरण परिसरासोबतच चिपळूण आणि संगमेश्वरच्या काही भागातही जाणवले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, नागरिकांना सतर्क राहण्याचेही आवाहन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)