कोयना धरणातील पाणी वाटपाचे फेरनियोजन जाहीर

5 टीएमसी पाणीसाठा पाटण व कराड तालुक्‍यातील दुष्काळी गावांना देण्यात येणार

कोयनानगर, दि. 9 (प्रतिनिधी)
राज्य शासनाने पाटण तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी आ. शंभूराज देसाई यांच्या मागणी वरून पाटण तालुक्‍यातील 110 गावामध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. पाटण व कराड तालुक्‍यातील कोयना नदीकाठचे जमीनक्षेत्र हे उपसा जलसिंचन योजना व खाजगी योजना मध्यमातून ओलिताखाली येत आहेत. धरणातून सिंचनासाठीचे सोडण्यात येणारे पाणी हे सांगली जिल्ह्याला न देता ते पाटण व कराड तालुक्‍यातील दुष्काळी गावांना देण्यात यावे ही आ. शंभूराज देसाई यांनी केलेली मागणीला शासनाने ग्रीन सिग्नल दिला आहे. यामुळे कोयना धरणातील सिंचनासाठी देण्यात येणाऱ्या पाणी वाटपाचे फेरनियोजन जाहीर झाले आहे. सातारा जिल्हाधिकारी यांच्या मागणीप्रमाणे कोयना धरणातील पाणीसाठा आरक्षित केला आहे. पूर्वेकडील सिंचनासाठी कोयना धरणातून देण्यात येणाऱ्या पाणीसाठ्यांवर यामुळे निर्बंध आले असून 5 टीएमसी पाणीसाठा हा पाटण व कराड तालुक्‍यातील दुष्काळी गावांना देण्यात येणार आहे. अडचण आली तर पश्‍चिमेकडील वीज प्रकल्पासाठी देण्यात येणारा पाणीसाठा सिंचनासाठी वापरुन वीजनिर्मिती साठी कमी पाणी वापरण्याच्या धोरणावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे कोयनेच्या पाण्याने पेटते वळण घेतले आहे.
राज्य शासनाने पाटण तालुक्‍यातील 110 गावे दुष्काळ सद्रुष्य म्हणून जाहीर केली आहेत. पाटण तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी आ. शंभूराज देसाई यांनी घेतलेल्या विशेष परिश्रमामुळे हे शक्‍य झाले आहे. पाटण तालुक्‍यातील 110 तालुक्‍यात दुष्काळ जाहिर केल्यामुळे जून महिन्यापर्यंत कोयना धरणातून सिंचनाकरीता पूर्वेस जे पाणी सोडण्यात येते ते सांगलीला न जाता पाटण व कराड तालुक्‍यातील दुष्काळी गावांना प्रथम प्राधान्याने देण्यात यावे अशी मागणी आ. शंभूराज देसाई यांनी राज्य शासनाकडे केली होती.
या मागणीमुळे कोयना धरणातून पूर्वेकडे देण्यात येणाऱ्या सिंचनासाठीच्या पाणी वाटपाचे फेर नियोजन करण्याची बैठक 8 जानेवारीला झाली आहे. या बैठकीला सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले, सातारा सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील, टेंभू , तारळी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.
शासनाने जाहीर केलेल्या पाटण तालुक्‍यातील 110 दुष्काळी गांवाबरोबर कराड तालुक्‍यातील कोयना नदी काठचे जमीनक्षेत्र हे उपसा जलसिंचन योजना व खाजगी योजनाच्या माध्यमातून ओलिताखाली येत येत असल्याने त्याच्या मागणी प्रमाणे तेवढे पाणी आरक्षित करून त्या गावाची गरज भागविण्यात येणार आहे. जानेवारी ते जून या 6 महिन्यात पूर्वेकडील सिंचनासाठी कोयना धरणातून 20 टीएमसी पाणीसाठा देण्यात येणार आहे. तर 43 टीएमसी पाणीसाठा हा पूर्वेकडील वीज प्रकल्पासाठी आरक्षित करण्यात आला आहे.
पूर्वेकडे सिंचन व बिगर सिंचनासाठी देण्यात येणारा 20 टीएमसी पाणीसाठयातील 5 टीएमसी पाणीसाठा हा पाटण तालुक्‍यातील 110 दुष्काळी व कराड तालुक्‍यातील गावांना आरक्षित करण्यात आला आहे. तर 15 टीएमसी पाणीसाठा सांगलीला देण्यात येणार आसल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कोयना धरणातील 20 टीएमसी पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन व बिगर सिंचन प्रकल्पासाठी जून महिन्यापर्यंत अरक्षित केला होता. शासन निर्णयाने हा पाणीसाठा सातारा जिल्हाधिकारी यांच्या मागणीप्रमाणे राखीव ठेवण्यात येणार आहे. 5 टीएमसी पाणीसाठा पाटण व कराड तालुक्‍यात देण्याचे आमचे नियोजन आहे. तर 15 टीएमसी पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन व बिगर सिंचन योजनाना देण्यात येणार आहे. कोयनेच्या पाण्यावर वीज प्रकल्प सुध्दा कार्यान्वित आहेत. पाणी वापर नियोजनात काही अडचण आली तर पश्‍चिमेकडे वीज प्रकल्पासाठी देण्यात येणाऱ्या पाणीसाठ्याचा वापर सिंचनासाठी करण्यात येणार आसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)