कोयना धरणग्रस्तांसाठी श्रमिक मुक्ती दलाचा मोर्चा

सातारा, दि. 2 (प्रतिनिधी) – कोयना धरणग्रस्तांसोबत सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यासमवेत झालेल्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी करा, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
साताऱ्यातील बोगदा परिसरातून दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास भव्य मोर्चाची सुरूवात झाली. राजवाडा ते राजपथ ते शाहु चौक ते पोवई नाका मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचला. यावेळी डॉ. पाटणकर यांनी धरणग्रस्तांना मागदर्शन केले व त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले की, धरणग्रस्तांची पुर्नवसन प्रक्रिया 65 वर्ष रखडली असल्याने यापूर्वी कोयनानगर येथे प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसमवेत मार्च 2018 मध्ये झालेल्या बैठकीतील निणर्यांची सहा महिन्यानंतरही अंलबजावणी झालेली नाही. तरी, पात्र प्रकल्पग्रस्तांचे संकलन रजिस्टर तात्काळ तयार करा. ज्या धरणग्रस्तांना अद्याप जमीन दिलेली नाही किंवा अंशत: दिलेली आहे परंतु सिंचनाची पुर्तता केली आहे अशा प्रकल्पग्रस्तांना निर्वाह भत्ता तीन हजार रूपये देण्याचे मान्य केले होते. त्याची पुर्तता तात्काळ करा. कोयना धरणाच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या सहकारी संस्था, सुतगिरण्या, कारखाने व इतर क्षेत्रात धरणग्रस्तांच्या मुलांना नोकऱ्या द्या. कोयना धरग्रस्तांना पर्यायी जमीन उपलब्ध करून जमिन वाटप सुरू करण्यात यावे. वीज निर्मिती क्षेत्रात प्रकल्पग्रस्तांना नोकरी अथवा आर्थिक मोबदला देण्यात यावा. प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या जमीनींना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्या. अभयारण्याकडे वर्ग केलेल्या जमिनी परत शेतकऱ्यांना देण्यात याव्यात. अभयारण्य व धरणक्षेत्रातील पर्यटन स्थळे धरणग्रस्तांच्या ताब्यात देण्यात यावीत, अशा विविध मागण्या यावेळी प्रशासनापुढे मांडण्यात आल्या.यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे हरिश्‍चंद्र दळवी, संतोष गोटल, चैतन्य दळवी, मालोजीराव पाटणकर, प्रकाश साळुंखे, संजय लाड, बळीराम कदम, आनंदा जाधव, दाजी पाटील यांच्यासह हजारो धरणग्रस्त उपस्थित होते.
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे
यावेळी डॉ. भारत पाटणकर यांच्यासह शिष्टमंडळाची अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत बहुतांश मागण्यांवर सकारात्मक चर्चा करुन त्या मागण्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे लेखी आश्‍वासन प्रशासनामार्फत देण्यात आले. तद्‌नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या धरलेल्या हजारो धरणग्रस्तांनी आंदोलन मागे घेतले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)