कोयनानगरच्या वैभवात पडणार भर

शासकीय विश्रामगृह टाकणार कात : शासनाकडून दोन कोटींचा निधी उपलब्ध

कोयनानगर – देशाचे वैभव असणाऱ्या कोयना प्रकल्पाला लागलेली घरघर थांबून कोयना प्रकल्प पुन्हा गतिमान होण्याच्या मार्गावर आहे. कोयना प्रकल्पाचे वैभव असूनसुध्दा इतिहास जमा होत असलेली मोडकळीस आलेले कोयनानगर येथील शासकीय विश्रामगृह इतिहास जमा होवू नये, यासाठी शासनाने पुढाकार घेवून 2 कोटींचा निधी दिला आहे. कात टाकणारी ही इमारत कोयनानगरच्या वैभवात भर घालणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आशिया खंडात नावलौकिक प्राप्त केलेला व आयएसओ या मानांकनाने गौरवलेला कोयना प्रकल्पाच्या निर्मिती वेळी कोयनानगर येथे वरीष्ठ अधिकारी, राजकीय पदाधिकारी यांच्या विश्रांतीसाठी कोयनानगर येथे वर्ग-1 दर्जाचे अलिशान चेमरी हे विश्रामगृह उभारण्यात आले होते. आजपर्यंत या विश्रामगृहाने सहा दशकाचा टप्पा ओलांडला आहे. कोयना धरणाच्या पायथ्याजवळच हे विश्रामगृह असल्याने येथून धरणाचे विलोभनीय दृश्‍य सहजपणे दिसते. आजपर्यंत या विश्रामगृहात अनेक अधिकारी, पदाधिकारी, नेते, अभिनेते याचे वास्तव्य राहिले आहे. कोयना व राज्याच्या प्रगतीचे साक्षीदार म्हणून या विश्रामगृहाकडे बघण्यात येते.

या अलिशान विश्रामगृहाची देखभाल व दुरुस्ती जलसंपदा विभागाचा कोयना प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येत होती. यासाठी कोयना प्रकल्पाने पुरेसा कर्मचारी वर्ग या ठिकाणी तैनात केला होता.चार वर्षापासून कोयना प्रकल्पालाच घरघर लागल्यामुळे कोयना प्रकल्पाने देखभाल व दुरुस्तीचे काम बंद केल्यामुळे हे विश्रामगृह मोडकळीस आले होते. त्यातच कोयना प्रकल्पाने याचा वापर बंद केला. यामुळे कोयनेचे हे वैभव इतिहासजमा झाले होते.

कोयनेचे वैभव असणारे हे विश्रामगृह नव्याने उभारून बंद पडलेली कोयना गतिमान करावी, यासाठी तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी आ. शंभूराज देसाई यांच्या बरोबर शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याकडून सामुहिक व शर्थीचे प्रयत्न होत असल्याने बंद पडलेली कोयना हळूहळू सुरू होत आहे. या विश्रामगृह नवीन उभारणीसाठी शासनाने 2 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. लवकर सुसज्ज अशी नवीन इमारत उभी राहणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)