कोयत्याने वार केल्याप्रकरणात तिघांना पोलीस कोठडी

पुणे – कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्या तिघांना दोन दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
अमर चंद्रकांत कांबळे (वय 32), सचिन चंद्रकांत कांबळे (वय 28), रूपेश राजेंद्र गायकवाड (वय 23, सर्व रा. मंगळवार पेठ) अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी ऋषीकेश सुनील बागुल, अतिश सुनील बागुल, गणेश बागुल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राकेश मनोज परदेशी (वय 24, रा. शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. 14 मे 2018 रोजी ही घटना घडली.
अतिश बागुल याच्याबाबत पोलिसांना खबऱ्या देतात म्हणून फिर्यादींना अतिश याने शिवीगाळ केली. त्यामुळे त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर अतिश याने त्याच्या इतर साथीदारांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर पुन्हा फिर्यादींना शिवीगाळ केली. त्यावेळी ऋषीकेश याने त्याच्या जवळील कोयत्याने फिर्यादींच्या पाठीवर वार केला, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील हत्यार जप्त करण्यासाठी, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तिघांना पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकीलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)