कोयत्याचा धाक दाखवून 14 हजाराचा ऐवज लूटला

पुणे,दि.12- कोयत्याचा धाक दाखवून एका तरुणाचा 14 हजाराचा ऐवज लूटण्यात आला. ही घटना वडगाव-बुद्रुक येथील समाज मंदिराजवळ शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी तीघांविरुद्द सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आले आहे.
सतीश ज्ञानोबा शिंदे(25,रा.तुकाईनगर) व श्रीकांत सिंधु यादव(24,रा.कर्वेनगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी रमेश चौधरी(34,रा.वडगाव-बुद्रुक) हे व आरोपी एकाच परिसरात रहाणारे आहेत. त्यांची आरोपींबरोबर तोंड ओळख आहे. ते घटनेच्या दिवशी पायी जात असताना त्यांना तीघाही आरोपींनी अडवलेह. त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर कोयत्याचा धाक दाखवून त्यांना शिवीगाळ करुन लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. यानंतर त्यांच्या खिशातील सहा हजाराची रोकड व आठ हजाराचा मोबाईल जबरदस्तीने काढुन घेतला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक गवते यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)