कोयता बाळगणाऱ्या तरुणास अटक

पिंपरी – परिसरात दहशत पसरविण्यासाठी कोयता बाळगणाऱ्या तरुणास पोलिसांनी सापळा रचून अटक केली. गुरुवारी (दि. 21) चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली. आकाश उर्फ कपाळ्या राजू काळे (वय-28, रा. लिंकरोड, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे हा दहशत पसरविण्यासाठी कोयता बाळगत असल्याची खबर त्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यास लिंकरोड येथील पत्राशेड झोपडपट्टीमधून अटक केली. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)