कोयता चालवणाऱ्या हातांना मिळाला सन्मान

पवारवाडी येथे ऊसतोड मजुरांच्या हस्ते भारतीय मराठा संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

काळगाव –
भारतीय मराठा संघाच्या सन 2019 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन ऊसतोड मजुरांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. कुठरे-पवारवाडी, ता. पाटण येथील अविनाश पवार हे गेली आठ वर्षे भारतीय मराठा संघाची दिनदर्शिका प्रकाशित करत आहेत. वर्षभर राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती या दिनदर्शिकेत दिली जाते. सन 2019 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन ऊसतोड मजुरांच्या हस्ते करुन त्यांनी कोयता चालवणाऱ्या हातांना सन्मान देण्याचा अनोखा उपक्रम फडात जावून राबविला.

अविनाश पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे यानिमित्त सर्वत्र कौतुक होत आहे. भारतीय मराठा संघाच्या माध्यमातून संघामधील लोकांना मदत करणे, वंचित विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क भरणे, विविध उद्योगपतींचे मार्गदर्शन, मराठा आरक्षणात सहभाग, मोफत शालेय साहित्य वितरण, शाळांना संगणक प्रदान असे विविध उपक्रम अविनाश पवार यांनी राबविले आहेत. ऊसतोड मजुरांच्या हस्ते प्रकाशन घेऊन त्यांना सन्मान देण्याचा प्रयत्न केला असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच यावेळी भारतीय मराठा संघाच्यावतीने सर्व ऊसतोड कामगारांना तसेच त्यांच्या मुलांना चहा व नाश्‍ताही देण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या उपक्रमाबाबत ऊसतोड कामगारांनी पवार यांचे आभार मानत अजूनही समाजामध्ये माणुसकीचा ओलावा शिल्लक असल्याचे मत व्यक्‍त केले. यावेळी अविनाश पवार, अंकुश पाटील, शेतमालक राजेंद्र पाटील, सुनील पवार, पत्रकार हरीष पेंढारकर, मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)